बंद करा

संस्कृती आणि वारसा

वैशिष्टपूर्ण ग्रामीण जीवन

ग्रामीण जीवन

सिंधुदुर्ग जिल्हा येथे वैशिष्टपूर्ण ग्रामीण जीवन अनुभवता येते. मुख्य रोजगार शेती असल्यामुळे हिरवीगार भात शेती पावसाळ्यात अनुभवता येते. घरे सामान्यता जांभा दगड वापरून बांधलेली व कौलारू आहेत. पर्जन्यमान सरासरी जास्त असल्यामुळे उतरती कौलारू घरे सापडतात. जोडधंदा पशुपालन व किनारी प्रदेशात मत्स्य व्यवसायावर आधारित जीवन बघायला मिळते.जिल्ह्यातील बहुतांश भाग हा दाट वर्षावनाने झाकला गेलेला आहे.जंगली मांजरे या रानटी प्राण्यांसाठी तसेच ससे,रानटी कोंबड्या व रानटी रेडे यांच्यासाठी उपयुक्त निवासस्थान आहे.जंगली रेडे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी अभयारण्यातून अन्न पाण्याच्या शोधात येथे येतात.अलीकडेच कर्नाटकातील खानापूर जंगलातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात हत्तींचा प्रवेश झाला आहे.इथे प्रथमच वस्त्तीच्या शोधात हत्तींनी प्रवेश केला.तिलारी येथील प्रमुख पाठबंधारे प्रकल्प हा घनदाट वर्षावनांचा प्रदेश असून हत्तींसाठी एक महत्वाचे स्थान बनले आहे.परंतु येथील स्थानिक लोकांना हत्तींमुळे झालेली पिंकाची नासधूस व वृक्षतोड यांचा सामना करावा लागत आहे.

 

लाकडी खेळणी

लाकडी खेळणी

सावंतवाडी येथे लाकडी खेळणी बनविण्याच्या व्यवसायाला राजाश्रय मिळाला आहे. तसेच हि कला करणारे कारागीर गोवा व कारवार येथून सावंतवाडी येथे वसलेले आहेत .या लोकसमुहास चित्तार असे संबोधतात . रंगीबेरंगी लाकडी खेळणी दिसायलाही हुबेहूब असतात. सावंतवाडी या  शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते.