बंद करा

इतिहास

रूपरेखा

सिंधुदुर्ग जिल्हा हा ५,२०७ चौ.किमी. क्षेत्रामध्ये पसरलेला आहे. या जिल्ह्याची लोकसंख्या २००१ च्या जनगणने प्रमाणे ८,६८,८२५ एवढी आहे. आधुनिकीकरण करण्यात आलेले सिंधुदुर्गनगरी हे शहर जिल्ह्याचे मुख्यालय आहे. सिंधुदुर्ग हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून बेळगाव जिल्हा (कर्नाटक राज्य) आणि गोवा राज्याने तर उत्तरेकडून रत्नागिरी जिल्ह्याने वेढला गेलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील हवामान नेहमी उष्ण व दमट असते त्यामुळे तापमानावर बदलत्या ऋतूंचा फारसा परिणाम होत नाही. येथील कुडाळ, कणकवली व सावंतवाडी या प्रमुख शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग क्र.१७ तसेच कणकवली, सिंधुदुर्गनगरी, कुडाळ, सावंतवाडी येथील रेल्वे स्थानकांवरून येथे पोचता येते. रत्नागिरी, बेळगाव (कर्नाटक) आणि दाभोली (गोवा) ही जवळील विमानतळे आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्याचा संक्षिप्त इतिहास

सिंधुदुर्ग जिल्हा हा ‘कोकण’ या उंच पठारी प्रदेशाच्या पश्चिमेला असून ऐतिहासीक रीत्या आपल्या आपल्या लांब तट रेखा आणि सुरक्षित बंदरे यांसाठी प्रसिद्ध आहे. हा जिल्हा पूर्वी रत्नागिरी जिल्ह्याचा एक भाग होता. परंतु १ मे १९८१ पासून प्रशासकीय सुविधा तसेच औद्योगिक आणि कृषी विकास यांच्या साठी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा २ जिल्ह्यात विभागीत करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ला, मालवण, देवगड, कणकवली, वैभववाडी आणि दोडामार्ग अशा ८ तहसील केंद्रांचा समावेश होतो. ‘कोंकण’ हा शब्द मुळ भारतीय व पुरातन असून या नावाची पुरेशी माहिती उपलब्ध नाही.

रत्नागिरी जिल्हा हा शिलाहारांच्या अधिपत्याखाली होता आणि बहुधा त्यांच्या राज्याची राजधानी गोवा होती. ह्या राजधानीचे स्थलांतर नंतरच्या काळात अधिक मध्यवर्ती स्थान जसेकी रत्नागिरीच्या आसपास अथवा खारेपाटण येथे केले गेले असावे.
चंद्रपूर हे कोकणातील प्राचीन शहरांपैकी एक आहे. ते बहुधा चालुक्य राजा पुल्केशीन दुसरा याचा मुलगा चंद्रादित्यद्वारा स्थापित करण्यात आले होते. सोळाव्या शतकात संपूर्ण पश्चिम किनारपट्टीवर पोर्तुगीज सत्तेचा उदय झाला आणि सिंधुदुर्ग जिल्हा याला काही अपवाद नव्हता. अखेर १६७५ मध्ये सुलतानाच्या हातून हा जिल्हा शिवरायांच्या हाती आला. मराठ्यांनी १८७१ पर्यंत जिल्ह्यावर वर्चस्व राखले मात्र १८७१ मध्ये ब्रिटीश आणि पेशव्यां मधील संघर्ष संपला आणि जिल्हा ब्रिटिशांच्या हातात गेला. ई. स. १८१९ मध्ये दक्षिण कोकण नावाचा वेगळा जिल्हा निर्माण करण्यात आला व त्याचे मुख्यालय प्रथम बाणकोट व नंतर रत्नागिरी येथे ठेवण्यात आले. १८३० मध्ये उत्तरेकडील तीन उपविभाग ठाणे जिल्ह्यात वर्ग केले गेले आणि सिंधुदुर्गला एका उपजिल्ह्याचा दर्जा देण्यात आला.

१८३२ मध्ये रत्नागिरी नावाने एक नवीन जिल्हा निर्माण करण्यात आला. ई.स.१९४५ मध्ये कणकवली नावाचे एक नवे महल (तहसील) निर्माण करण्यात आले. तद्नंतर ई.स. १९४९ मध्ये पूर्वीच्या सावंतवाडी संस्थानाचे जिल्ह्यात विलीनीकरण करण्यात आले व तालुक्यांच्या सीमा निश्चित करण्यात आल्या. याच वर्षी सावंतवाडी हा स्वतंत्र तालुका निर्माण करण्यात आला तसेच कुडाळ आणि लांजा असे दोन तहसील ठरवण्यात आले. १९५६ मध्ये राज्यांचे पुनर्वसन होत असताना हा जिल्हा मुंबई प्रांतामध्ये समाविष्ट करण्यात आला व १९६० पासून तो महाराष्ट्र राज्याचा एक भाग आहे. या जिल्ह्याला येथील प्रसिद्ध ‘सिंधुदुर्ग’ किल्ल्याचे नाव देण्यात आले आहे. शिवाजी महाराजांनी मालवण नजीक बांधलेल्या या किल्याचा अर्थ ‘समुद्री किल्ला’ अस होतो. २५ नोव्हेंबर १६६४ साली सुरु झालेले या किल्ल्याचे बांधकाम तब्बल ३ वर्षांनी अशा रीतीने पूर्ण झाले की अरबी समुद्रा मार्गे येणाऱ्या शत्रूला हा किल्ला दिसणे अवघड होते.