संस्कृती आणि वारसा

Filter by:
लाकडी खेळणी

लाकडी खेळणी

प्रकाशित केले: 20/06/2018

सावंतवाडी येथे ऐतिहासिक काळापासून लाकडी खेळणी बनविण्यास राजाश्रय मिळाला . सावंतवाडी शहर हे हुबेहूब रंगीबेरंगी लाकडी खेळणी व फळे बनविण्यास सुप्रसिद्ध आहे. हि खेळणी बनविणारे कारागीर हे ‘चीत्तारी’ लोकसमूहातील  असून गोवा व कारवार येथून सावंतवाडी येथे स्थायिक झाल्याचे सांगण्यात येते. रंगीत असणारी हि खेळणी व फळे खरी असल्याचा भास होतो.

ग्रामीण जीवन

वैशिष्टपूर्ण ग्रामीण जीवन

प्रकाशित केले: 20/06/2018

सह्याद्रीतली हिलस्टेशन्स, धबधबे,किल्ले, जंगले बॅकवॉटर्स, नद्या, सागरी किनारे ही निसर्गाची सगळी रुपं मनाला भावतात. हजारो वर्षांची संस्कृती,लोककला, ग्रामीण जीवन, खाद्यासंस्कृती हे सारं इथे अनुभवता येतं. तापवणाऱ्या उन्हाळ्यानंतर पावसाळ्याच्या दिवसांतही कोकणात फिरणं हा एक मस्त अनुभव ठरू शकतो.